आई
आई
1 min
12.3K
थकले तुझे हात आई,
पायात बळ नाही,
उगळला चंदन,सारा,
घासली सारी काया.
तुझ्याविना सांग मला,
असेल का ईश्वर दुसरा,
पापणी जड झाली,
उचलेना देह काही.
चालती बोलती आई,
चमकती जशी वीज नभी,
शब्दगंधा तू,सरस्वती तू,
ज्ञानप्रभू तू, ईश्वरी तू.
आई तू माझी,जीवनकळा.
चमकता सुर्य,आई,
पश्चिम तळी आला.
होईल आता रात्र सारी,
आई कोठे शोधू निवारा.
जळी बुडेल,विवेकसिंधू,
उरेल सारा पसारा,
मग, तुझ्याविन आई,
भेटू कोण्या ईश्वरा.
