STORYMIRROR

Ranjeeta Govekar

Others

4  

Ranjeeta Govekar

Others

आई

आई

1 min
180

सावलीसुद्धा आपली साथ

सोडते ना जेव्हा

खरंच सांगते आई

खूप आठवण येते तेव्हा...


तुझ्या कुशीत असताना ना

भीती कधीच नसायची

तुझ्या मायेच्या पदराआड

ती लपूनच बसायची...


पण...

एकट्या पडल्या पिलाचं या

आई मन जेव्हा दुखतं ना...

कुणी नसतंच त्याचं

प्रत्येकाचंच जग वेगळं असतं ना..?


आई गं... वाटतं खूप खूप

तू जवळं जरा घ्यावं

तू एकटी नाहीस बाळा

तू बळ मला द्यावं...


तुझं माझं नातं आई

नाळेमधुन जुळलेलं

म्हणूनच का मन माझं

तुलाच फक्त कळलेलं..?


आत्तासुद्धा आठवण तुझी

पण तूच येत नाहीस...

चुकलं असेल हे वेडं बाळ

तू मिठीत घेत नाहीस...


साहित्याला गुण द्या
लॉग इन