आई
आई
आई साठी काय लिहू
आई साठी कसे लिहू
आई साठी पुरतील एव्हढे
शब्द नाही कुठे
आई वरती लिहिण्या इतपत
नाही माझे व्यक्तिमत्त्व मोठे ......
आई ऐक नाव जगावेगळा भाव
आई एक जिवन प्रेमळ मायेचं लक्षण
आई एक श्वास जिव्हाळ्याची रास
आई एक वाट आयुष्यातील सर्वात पहिली गाठ......
आई म्हणजे मंदिराचा कळस
आई अंगणातील पवित्र तुळस
आई भजनातील गुणगुनावी अशी संतवानी
आई म्हणजे वाळवंटात प्यावं अस थंड पाणी.......
आई ऐक अथांग सागर
आई ऐक प्रेमाचं माहेर घर
आई आरती तील ऐक लयबद्ध टाळी
आई वेदनेवरची सर्वात पहिली आरोळी ........
माया ममता भरुनी जीव लावते ती आई
तिच्या सारखी जगात अशी ममताच नाही
प्रेम स्वरूपात तिचे वात्सल्य मनात ठाई
घराघरात दारादारात तुझे स्मरण होते ग आई ........
