आई
आई
2 mins
180
अंधारात राहून उजेडासाठी
कोणीतरी जगतं असतं
सूर्यायसमान माय माझी तळपते
स्वार्थाचं जीणं अजिबात नसतं.....
प्रत्येक नातं सदोदित निभावते
कधीच कुरबूर करत नाही
सार्यांना ती प्रेम लावते
मुलांकडे अतीमायेनं पाहते......
आई पण एक मुलगीच न हो
तिच्या आईबाबांची लाडाची
पण माहेर सोडून सासरी येते
सासरची होते मग ती प्रेमाची....
पूर्ण कुटुंबाला सांभाळते
सगळ्यांना हवे नको ते पाहते
माझ्या बाबांसाठी सजते सवरते
आनंदानं संसारात छान रमते,...
जन्म दिलाय या माऊलीने
हर्षाने सारी कामे करते
संस्कार लावते मुलाबाळांना
वृद्ध सासू सासर्यांना सांभाळते.....
