आई
आई
1 min
246
जसे आषाढी वारीत चालावे
तसे मी ८४ लक्ष योनी फिरलो
आणि तुझ्या उदररूपी गावात
पंढरपुरात मी दाखल झालो
माझ्या या वाटचालीमध्ये
मजकडून पाप झाले तर
चंद्रभागेत स्नानाने पापमुक्त होते
तसे मला तु पापातून मुक्त कर
मी जेंव्हा जगात आलो तेव्हा
रुख्मिणी मातेच्या दिव्य स्वरूपात
प्रथमतः तूच दिसलीस मला
प्रसन्न चेहरा खूप आंनदात
तू म्हणजे तुकारामाची अंभगवाणी
तू म्हणजे संगीतातील रागिणी
तू म्हणजे शुद्ध पावसाचे पाणी
तू माझ्यासाठी आहेस जीवनगाणी
