STORYMIRROR

pooja thube

Others

4  

pooja thube

Others

आई

आई

1 min
289

आईच्या छायेत असतो गोडवा  

तिचा हात जन्मभर न सोडावा 


आईच्या जवळ वेगळीच ऊर्जा मिळते 

आईच्या सोबत असण्याने संकट टळते


स्वतःच्या ताटातला घासही आई देऊ करते

सुखी रहावी अपत्ये ती त्याग करते 


अश्या आईच्या वाट्याला का यावा वृद्धाश्रम 

मोठे करण्यास तुम्हा तिचे का चुकले श्रम 


कधीच नाही फिटत उपकार माऊलीचे 

अप्रूप असते तिच्या आधाराच्या सावलीचे 


ती कधीच सोडत नाही पंखाखाली आपल्या पिल्लांना घेणे 

आयुष्यभर लागतो आपण आईचे देणे 


Rate this content
Log in