STORYMIRROR

Sunita Ghule

Others

3  

Sunita Ghule

Others

आई

आई

1 min
580


अष्टाक्षरी


आर्ई माझा गुरू


आई माझा आद्य गुरू

ऋण आभाळाएवढे

दिले प्रेम नि संस्कार

सांगे जीवनाचे धडे।१।


संवेदना मन जपा

दिला पाठ दातृत्वाचा

माझ्या गुरूमाऊलीचा

भाव विश्वबंधुत्वाचा।२।


दीन दुबळ्यांची सेवा

शिकविली भावंडांना

धन्य गुरूरूप तिचे

घडविले सोसताना।३।


परखड स्पष्ट मते

व्यक्त करायचे मार्ग

नको मिंधेपण स्वार्थ

शिकवला सत्यमार्ग।४।


कष्ट करुनच घ्यावे

नको आयता हराम

थेंबा-थेंबातून साचे

वाचवून ठेवा दाम।५।


संसाराला वेलीपरी

प्रेम सिंचन वाढवी

नको राग हवा त्याग

माय नित्य समजवी।६।



Rate this content
Log in