आई
आई

1 min

233
वात्सल्याची मुर्ती । सर्वांचीच आई ।
जन्म नाव बाई । असे तिचे ।।१।।
भोगती यातना । ठेऊन गर्भात ।
असे आयुष्यात । नाना दु:खे ।।२।।
हसून झेलती । वादळे अनेक ।
विसरे कित्येक । कष्ट सारे ।।३।।
लेकरे अपुली । हवी गुणवंत ।
प्रयत्न अनंत । निरंतर ।।४।।
नसते अपेक्षा । चांगुलपणाची ।
असे जीवनाची । उपेक्षाच ।।५।।
दाखला न मिळे । जगी पाठीवर ।
आयु खडतर । नेहमीच ।। ६।।