आई
आई
1 min
231
आई सर्वा हवीशी
असते साधीशी
बंध अनमोल जीवनाशी
स्वभाव छान
गाळते घाम
तरी दिसते छान
महान ती फार
आयुष्याचा सार
जीवनाचा आधार
चेहरा स्मित
नेहमी घाईत
ठेवते सर्व प्रफुल्लित
आदर तिचा करा
माऊली सांभाळते घरा
नमन तिला करा
जीवन होईल बरे
उपकार ना तिचे सरे
हेच खरे, हेच खरे
