STORYMIRROR

shubham gawade Jadhav

Others

3  

shubham gawade Jadhav

Others

आई

आई

1 min
248

नतमस्तक झालो तुझ्या चरणी 

तेव्हा ३३ कोटी देव मला दिसले 

दूर गेलो जेव्हा तुझ्यापासून 

आयुष्य मला रिकामे भासले 


उपकार आहेत तुझे माझ्यावर 

न संपणाऱ्या क्षितीज्यापरी 

नाही फिटणार उपकार तुझे 

घातले माझ्या कातड्याचे जोडे तुझ्या पायी जरी 


९ महिने गर्भात मला तू 

स्वतःपेक्षा जास्त सांभाळलस 

होणाऱ्या नरक यातनांना 

हसत हसत कवटाळलस 


माझ्या असतित्वात नसणाऱ्या रूपाला 

आठवून क्षणोक्षणी खुश तू झालीस 

ठेच लागताच माझ्या पायाला 

आठवणीत पहिल्यांदा तू आलीस 


काय उपमा देऊ तुझ्या 

या निःस्वार्थ निर्मळ प्रेमाला 

आई हे रूप आहे महान 

फिके पाडते ३३ कोटी देवाला 


Rate this content
Log in