आई
आई
➿
आई
मुखी अमृताचा पान्हा
रांगतांना तान्हा
अनमोल क्षण आयुष्याचा
दावी वादळातील वाट
सद्गुणांची रास
धगधगता प्रवास आईचा
फाटता जरी जरा
मायेचा हुंबरा
नयनी भडभडा आगळाची
बाहुंना यावे बळं
शिवबाची धारं
साच्यातूनी ओती साळसुदं
सांगी अभंगाची ग्वाही
माता रमाई
भक्त घडावा तुक्याचा
बंधुभाव हेची साऱ्या
धर्माची नाडं
व्याख्यानी शिकवी विवेकानंद
जननी गहण साऱ्या
प्रश्नाचे उत्तर
वाहते निर्झर सदोदीत
करी आभाळाची शाई
सूर्याची समई
शिकवी भार जीवनाचा
वेडाळ कशी माया
चंदनाची काया
वात्सल्याचा ऊफाळा सागराचा
माय रुप खरे
निर्मिकाची देणं
हृदयात प्रेम जिजाईचे
