आई
आई
1 min
236
लेक हो लाडाची । आई न बाबांची ।।
झाली सजणाची । नववधू ।।
रमली संसारी । संसार फुलला ।
आनंद मिळाला । कुटुंबात ।।
सखी झाली आता।माऊली हो माझी।।
तशी आहे तुझी ।आईपण ।।
कुंकूम कपाळी।लावे लालेलाल।।
गुलाबी हो गाल। शोभतसे।।
आई माझी सखी। आई माझा गुरू ।।
जसे दत्तगुरू। समोरच।।
आईला वंदन । जीवनी आणले।।
संस्कारही दिले । जगण्याचे।।
मीच झाले आई । मुलांना वाढवी।
मूल्येही शिकवी ।। जीवनाचे ।।
