आई
आई
..... आईच्या हातची चव
कोणत्या हाटेलात नाहि
कसेहि असलं तरी "गुणी पोरं
माझं " म्हणे ती एकटिच बाई ....
...सोबत हसते ,पण
एकट्यात कधी रडते
तापामंधी लेकरांच्या
काळजीने ती बडबडते ....
....वाढवते ती माऊली
पोटात नऊ महिने लेकरु
काळजी वाटते जिवाले कसे होईल
जेव्हा जाईल कळपात माझं कोकरु ...
....होऊन कधी "जिजाऊ "
स्वराज्याची स्वप्न दाखवते
होऊन" श्रीकृष्ण" मग ती
अर्जुनाले गीतज्ञान शिकवते ....
...नाहि करता येत पैशात
कधीच आईच्या प्रेमाचे मोल
स्वर्गाहुनहि जास्त सुखी वाटते
जेव्हा बाळ बोलते पहिले बोबडे बोल ...
...असेल हजाराचा पलंग
अन् त्यावरी लाखाची उशी
पण त्यापेक्षा ऊबदार
माझ्या आईची कुशी....
