आई
आई
माणसाला जे वारसाने मिळते,
त्याची किंमत त्याला कधी नसते.
आईची किंमत बाळाला तेव्हा कळते,
जेव्हा बाळाला आई नसते.
जगात ती एक्मात्र माउली असते,
वेदना देनारा बाळाचे पोषण करते.
तीला मिळालेली पीडा लगेच विसरते,
वासल्याचा हात बाळावर सारखा फिरवते.
जीवापार बाळाला ती जोपासते,
सारखे त्याचे कौतुक तीच करते.
थोडीही शंका जेव्हा-कधी तीला येते,
बाळाची काळजी ती जीवापार घेते.
चिमुकले बाळ तीच्या विश्वासाने वाढते,
त्याच्या सुखा साठी दिवस-रात्र झटते.
बाळ्याच्या छोट्या-छोटाया कृति ती बघते,
त्यातच आनंदाचे विश्र्व ती बघते.
बाळाला वाढवण्यात जीवाच रान करते,
पण वाढत्या बाळाला तीची किंमत नस्ते.
तीच्या संसाराच उदिष्ट फ्क्त बाळच असते,
ती सारखी चारभिंतीतच आनंदी होत असते.
हट्टी ,नादान,तर्कहीन बाळ प्रश्न करते,
आई कुठे काय माझ्या साठी करते.
त्याची जानीव त्याला तेव्हाच होते,
जेव्हा त्याची आई जग सोडुन जाते
