STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Others

3  

Samiksha Jamkhedkar

Others

आई

आई

1 min
206

झोळीत झोपले ते बाळ शांत

निघे कामाला माऊली निवांत

होताच तीन चार तास

मनी बाळ उठण्याचा ध्यास

येता झोळी जवळ बाळ झोळीत खेळे शांत।

काढे डोके हळूच वरती।

बघे दिसते का आई भोवती।

दिसे आई ती समोर

मग काय तो आनंद

घेई बिलगून त्यास उराशी

बाळ केविलवाणी दिसशी

घेई अमृताचा घोट

काय माय लेकराचा तो थाट

भरता चिमुकल्याचे पोट

नयनी आईच्या अश्रूंचा पाट।

असेच असते ना हो मुके देखील प्राणी

जसे घरट्यात पिलू आणि चिमणी

देवास वाटले असेल आपण जाऊ नाही शकत प्रतेक ठिकाणी।

म्हणूनच त्याने लक्ष ठेवण्या

आपल्या पिलाकडे प्रत्येकालाच

दिली निस्वार्थी माता, माय ,माउली ,जननी।

माता, माय, माऊली जननी।


साहित्याला गुण द्या
लॉग इन