आई
आई
1 min
277
स्वामी तिन्ही जगाचा
आई विना भिकारी
आई महान दैवत भारी
आईची माया, जश्या पावसाच्या सरी//१//
आईची किमया न्यारी
वेळेवर देते, भाजी भाकरी
आई असते, प्रथम गुरु
सदा सर्वदा,"आई"नाम स्मरू//२//
आईचा करू चरण स्पर्श
दुःखी मनाला होईल हर्ष
आशिर्वाद येईल कामी
पडणार नाही, काही कमी//३//
"आई"जीवन आधार
होतील स्वप्ने साकार
"आई"नाम पदोपदी
घ्यावे सदा, देवाआधी//४//
