आई
आई
ममतेची छाया आई
कर्तव्याची जाण तिला
हित जपण्या बाळाचे
किती कष्टते जीवाला. //1//
मनी रंगविते स्वप्न
बाळ साहेब होण्याचे
हाल अपेष्टा सोसून
हट्ट पुरवी बाळाचे. //2//
घडविते सुसंस्कार
बालपणी बाळावर
जिवापाड जपते ती
व्हावा बाळाचा उद्धार . //3//
जरी रागावली कधी
राग नसतो मनात
बाळ व्हावा माझा गुणी
हीच इच्छा हृदयात . //4//
लहानाचा मोठा व्हावा
बाळ शिकण्यास जावा
खूप शिक्षण शिकून
मोठा साहेब तू व्हावा . //5//
चिंता बाळाची असते
सदा आईच्या जीवाला
बाळ दिसल्याशिवाय
चैन पडेना मनाला . //6//
