"आई"
"आई"
1 min
287
काय लिहू तिच्या विषयी
शब्दात मांडता येत नाही
कमी पडतात शब्द अलंकार
अपुरे कागद आणि शाही
शृंगारा विन सुंदर दिसते
प्रत्येक लेकराल जी बाई
ती अन् तीच असतेे
त्या बाळाची "आई"
जिच्या उदरी होतो जन्म
ती बाई म्हणजे "आई"
जिच्या गर्भी जन्म घेण्यास
देवालाही मोह आवरला नाही
आईच्या प्रेमाला
काय देऊ उपमा
कल्पनेच्या पलीकडे
आईचा महिमा
