आई...!
आई...!
1 min
11.6K
कोणी म्हणे आई आई
कोणी म्हणे मम्मी मम्मी
कोणी म्हणे अम्मी अम्मी
पण खरी यम्मी यम्मी....!
पूर्व असो वा पश्चिम
असो उत्तर दक्षिण
चारी धाम सर्वकाळ
मायेचा इथे सुकाळ....!
आई आईच असते
ती कधी मॉम नसते
म्हणूनच अंतरात
सदा जिवंत राहते...!
जगण्याचे बळ देते
उठण्याची उर्मी देते
घरा आधार देते
सारे सामावून घेते....!
आई आहे श्वास आहे
आई आहे विश्व आहे
आई विश्वासच आहे
आई सर्वकाही आहे....!
