Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rohini Gandhevar

Others

2  

Rohini Gandhevar

Others

आई..!

आई..!

1 min
6.6K


आई.. .

 

आई ही आईच असते

नवनिताची खाण असते

पहिल्या सरीचा "मृदगंध" असते..

आंतरीक प्रेमाची दाद असते. 

 

आई बाळाची आई असते

कुटूंबाची शिकवण असते

समाजाचा आदर्श असते

अखंड युगाची माय असते.. 

 

बाळाला घडविते आई

कुटुंबाला सावरते आई

समाजाचे भुषण आई

आयुष्याची देवता "मुर्तीमंत" आई.. 

 

आई घडविते संस्कार

आई दैवी साक्षात्कार

सृष्टीतील जणु अविष्कार

व्हावा मातृ हृदयाचा सत्कार..

 

मणामणाची ओझी, ऊतरवली तरी ऋणफेड नव्हे..

आईचे ऋण फेडायला आईच व्हायला हवे..

 


Rate this content
Log in