आई
आई
1 min
426
तुझ्या उदरातूनच आई
लागला तुझा लळा
मला घालण्या जन्मास
तू अगनीत सोसल्या कळा.....
काय ग माझ्यासाठी आई
तुझ्या तपस्या आणि साधना
मुख पाहतच माझे तु
क्षणात विसरते तुझे वेदना......
माझ्याशीच जुळले आई
तुझ्या जीवनाचे तार
किती सोसतेस तु माझ्या
आयुष्याचे भार.....
तूझ्या माझ्या नात्यातील
आई स्पंदनाचे एकरूप मर्म
माझा होतच नवीन जन्म
तुझा ही होतो ना ग पुनर्जन्म.....
आपले नाते म्हनजे आई
प्रेम आणि आपुलकीचे ठेवा
आजही वाटते तुझ्या सोबतचे
ते बालपणाचे क्षण हवा.....
