आई
आई
वात्सल्याची तू मूर्ती
कशी माय माझी धरती
ओढ लावी तुझी प्रिती
ओवाळते तुझी आरती
अशी माझी आई
सांगू कशी तिची महती
चुलीवर भाकर टाकली
जेव्हा मी रडले तरी हाताला
चटके बसत असताना
कुशीत घेऊन बसली
घरातील पसारा आवरताना
कंबरेला कळ लागली असताना
पाठीचा झोका करून
माझं पिल्लू गं ते असे म्हणून
मला नेहमीच हसविले
तू जेवताना जेव्हाही मी रडले
अर्ध्या पोटी हात धुतला
हाताचा पाळणा करून
मला तूच गोंजरले
रात्री थकून झोपताना
अलगद डोळे पुसताना
पापण्यांचा पदर करून
मला तूच निजवले
ममता वसे तुझ्या ठायी
अवघे जग सांगते आई
आईविना पोरके झाले
तिन्ही लोकांचे देव आई
सांभाळ करून घरच्यांचा
संस्कार देऊन पोरांना
घडवतेस जगातील सर्व
होणाऱ्या भावी नागरिकांना
त्यागाची प्रेमळ मूर्ती
संसार सागरात तुझी साथ
कुरवाळून प्रेमाने लेकरांना
ठेवतेस डोक्यावर तू हात
अशी माझी आई
सांगू कशी तिची महती...
सांगू कशी तिची महती...