आई
आई
कुशीमध्ये तिच्या सारा स्वर्ग सामावला आहे
तिच्याविना देवही मायेचा भुकेला आहे
दिव्यामध्ये जळणारी वातही तीच आहे
उन्हामध्ये सावली, कधी गारव्यात उब आहे
डोळ्यामधील आसवांना तिचा पदर किनारा आहे
रुसलेल्या ओठांना मायेचा स्पर्श सहारा आहे
तिच्यामुळेच या घरालाही घरपण आहे
तिच्याविना जनू सारच व्यर्थ निरर्थ आहे
तिने भरवलेला प्रत्येक घास अमृततुल्य आहे
तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपणं स्वर्गासम आहे
देवाला या पृथ्वीवर रोज येणं शक्य होतं नाही
म्हणूनच की काय..? त्याने बनवली आई..!!
