STORYMIRROR

Jaymala Kulkarni

Others

3  

Jaymala Kulkarni

Others

आई तुझ्याशिवाय

आई तुझ्याशिवाय

1 min
11.9K

खूप खूप मोठ्ठ होता येतं 

पण आई, तुझ्याशिवाय जगणं खूप कठीण होतं!!!


आजूबाजूला जरी असतो मित्रांचा गोतावळा  

तरी त्यात नसतो तुझा प्रेम जिव्हाळा!!!


तुझ्याशिवाय जगणं खूप कठीण होतं

खानावळीतलं जेवण जेवतो मी रोज 

पण त्यात नाही तुझ्या हातच्या जेवणाची मौज!!!


तुझ्याशिवाय जगणं खूप कठीण होतं 

आठवण येते तुझी खूप 

सांगतो स्वतःलाच समजून उमजून 

मोठा झालास आता लहान नाही अजून, 

डोळयांतले पाणी मग लगेच टाकतो पुसून!!


तुझ्याशिवाय जगणं खूप कठीण होतं

दिवस असा तसा जातो गं निघून 

घरी आल्यावर विचारणारं नसतं कोणी आलास का दमून???

तुझ्या आठवणीने जीव येतो कळवळून 

गालावर अश्रू येतो मग ओघळून 

फिरव ना ग हात एकदा डोक्यावरून 

समजून सांग काही तरी एकदा कुरवाळून!!


तुझ्याशिवाय जगणं खूप कठीण होतं 

यावं पुढच्या आठवड्यात म्हणतंय माझं मन!!

तुझ्या आठवणीने काळजावर माझ्या उठलेत किती व्रण!!

कितीही मोठा झालो तरी तूच माझे धन तूच माझे धन!!


खुप खुप मोठं होता येतं आई

पण तुझ्याशिवाय जगणं खूप काठीण होतं!!!!


Rate this content
Log in