आई तुझ्या शिवाय हे जग नाही
आई तुझ्या शिवाय हे जग नाही
1 min
12.8K
आई तुझ्याशिवाय
हे जग नाही
तुझ्याशिवाय
माझे कोणी नाही
आई तुझी माया
म्हणजे माझी छाया आहे
तुझी ममता म्हणजे
काशी आणि गया आहे
आई तु म्हणजे
ममतेचा महामेरू आहे
तुझ्या कुशीतीले मी
लाडावलेल पाखरू आहे
आई तुला एव्हडेच सांगणे आहे
तुझे प्रेम म्हणजे
माझे जगणे आहे
तुझ्याशिवाय माझे
आयुष्य सरतं नाही
तुला वजा केल्यावर
बाकी काहीच ऊरत नाही
आई तुझ्या पदरातच
प्रेमाचा लडिवाळा आहे
तुझ्या चरणातच
सुख समृद्धीचा सोहळा आहे
