आई तुझ्या कुशीत
आई तुझ्या कुशीत
1 min
548
आई तुझ्या कुशीत
शिरायचं परत
तीच ऊब निस्वार्थ
अनुभवायची परत
मोठं होणं आई
सोपं नव्हतं गं
खडतर प्रवास
जीवनाचा गं
लहान होऊया वाटतं
निरागस शिशू सारखं
नकोसं का वाटतं
दगदगित जगणं ?
बाल्य अवस्थेत मला
किती छान वाटायचं
मी भेदरायला नको म्हणुन
तुझं मिठीत घेणं असायचं
