आई, माय
आई, माय
जीवापाड प्रेम करणाऱ्या जोडीदाराचा अंश,
सजवून घ्यायचा आपल्या काशीच्या उबेत,
आणि मग आकंठ बुडून जायचे,
त्या न पाहीलेल्या जीवाच्या मायेत
शरीर आणि मन किती रिकामं असत हे,
छोटसं हृदय स्वत:च्या उदरात तेव्हाच कळतं,
ती खेळकर, खोडकर पाऊलं जाणवतात जेव्हा स्वत: मध्ये,
"मी" पण संपून , आईपण तेव्हाच कळतं
आईपण असतं घोघावत्या वादळासारखं,
स्वत:लाच माहीत नसलेली स्वत: अमर्याद शक्ती,
आणि पुर्वी कधीच न अनुभवलेल्या
असंख्य काळजी आणि भीतीचं,
त्याला त्याच ताकदीने समोर जायचं असतं,
स्वत:ला हरवून बसण्यासाठी नाही,
तर स्वत:ला नव्यानं शोधण्यासाठी
