आई माझी
आई माझी
आई माझी लक्ष्मी जशी दुधावरची साय, तीच माझी माय.
घाम घालुनी करिती काम...
नाही काळजी कशाची. तिने भरवला सोना चांदी चा घास,
काम करण्याचा तीचे जीवन जाई सुबह श्याम...
हाता पायाला भेद पडले तरी पण थकले नाही कधी, म्हणूनच तिच्यामुळे संसार घडला....
शोभती आई आम्हास जिव तिच्या आमच्यावर नकळत का असेना
आमच्या प्रेमाला रंग चढला...
संसाराची बळकट केली दोरी तिने, दोन्ही लेखी वरती जीव...
हातामध्ये यश तिच्या मुळात नाव तीच लक्ष्मी खूप मोठा थाट तिचा तिला आमची मोठी कीव...
वडिलां सोबत संसार केला कधी डगमगली नाही,येईल त्या प्रसंगाला तोंड देऊन संसार घडविला....
आयुष्याची करी पारख,
त्यामुळेच घरात सुख नांदत
म्हणूनच स्वभाव तिचा आवडला...
शेतामध्ये काम करताना हात फक्त लावी, पीक येई घाई घाई...
आवाजामध्ये गोडवा तिच्या आनंदाने वाटे गुळ साखर. घराच्या सुखासाठी चाले दिंडी पाई पाई...
इतरांना मदत करता करता संपत नाही तिचे काम, मोलमजुरी करून बनवला दुप्पट दाम...
ती हाय म्हणून टिकलं घर, लोकांची उष्टी धुणी भांडी करून केलं तीन काम...
मुलगी म्हणूनी जन्मली मडिलगे तीचे गाव,
मुळात लक्ष्मी तिचे नाव
तेच नाव आई स्वरूप मला मिळाले
