आई माझा देव
आई माझा देव
आई का म्हणू मी तुला, तू देव माझा
उदरी तुझ्याच देवा, जन्म झाला माझा
उदरात तुझ्या देवा, त्रास मी दिला
तरी तू देवा, जन्म मला दिला
चालावयास देवा, तू वाट करीत गेला
काट्याच्या वाटेवरती देवा, तू फुले टाकत गेला
गुणवान व्हावे मी , तू अपार कष्ट केले
तुझ्याच कष्टाने मी, यश संपादन केले
घेण्यासाठी मी भरारी , तू पंखात बळ दिले
तुझ्याच आशिर्वादाने मी, विश्व निर्माण केले
शिकवण तुझीच देवा, सत्य वागत जावे
तुझ्याच शिकवणीने देवा, स्वप्न पूर्ण व्हावे
शिखरावाणी उभा मी, ही तुझीच कृपा देवा
क्षणो क्षणी येते आठवण, हे देणं तुझच देवा
मागणी हेची देवा, आता घडावी तुझीच सेवा
पुढील जन्म ही देवा, तुझ्याच उदरी व्हावा
