आई कुठे काय करते🌹🙏
आई कुठे काय करते🌹🙏
नऊ महिने काळजाच्या तुकड्याला जपते।
जीवावर उदार होऊन जन्म ती देते।
दुःखात देखील ती बाळाकडे बघून गोड हसते।
सांगाना आई कुठे काय करते-- 1
लहानपण जपत जपत त्याच
स्वतःकडे दुर्लक्ष करते।
तळहाताच्या फोडासारखं बाळाला ती जपत असते।
सांगाना आई कुठे काय करते--2
रात्री जर झाला काही त्रास बाळाला ।
जागरण करून मांडीवर थोपटते त्याला ।
सकाळी उठून प्रसन्नतेने लागते कामाला
ती आपल्या कर्तव्याला कधी चुकते।
सांगाना आई कुठे काय करते--3
घरातली सगळी कामे तिच्याभोवती।
सुख दुःख लेकरांची तिच्याच पदरी।
सामान ने आण, दवाखाना, दळण, बाजारहाट
ती नेहमीच आनंदाने पार पाडते
सांगाना आई कुठे काय करते--4
सगळं करता करता येते तिला चाळीशी।
सहन होत नाही कधी कधी तिलाही भावना असते तिच्या मनाची।
चीड चीड देखील तिने करायची नाही।
थकली तरी काही म्हणायचं नाही
ती पण तुमच्यासारखी एक माणूसच असते।
सांगाना आई कुठे काय करते
सांगाना आई कुठे काय करते
