आई खूप उशिरा कळते
आई खूप उशिरा कळते
थकले तुझे हात आई,
पायात बळ नाही,
उगाळला चंदन,
घासली काया,
तरी तुझ्या का गं एवढी,
पोटी माया...
तुझ्याविना सांग मला,
असेल का ईश्वर दुसरा,
पापणी जड झाली,
उचलेना काही,
मी तुझ्या पुढे, तू मला पाही...
अंगी खांदी खेळलो तूझ्या,
मन माझे आनंदले,
काय माझ्या श्रमाने,
हात तुझे थकले...
चालती बोलती विजेसारखी,
आई तू, सांग तू मला
आज शय्या का धरली,
बहू शब्दांचा पंडित मी,
शब्द बोललो तूला,
तुझ्याविण आई,
माझा शब्द, कोणी नाही ऐकला...
तुझ्या सवे, होते सोन्याचे दिवस,
मला नाही कळली, तू आई,
तू, काय होती? हात तुझे थकले,
पाय उचलेना,
तुझा आई विरह आता, साहेना...
आज मला तू, कळली तू,
होतीस कशी, मानी बानी,
स्वाभिमानी तू,
म्हणून का आई तू,
पापणी झाकली...
पाय थकले तुझे,
हात नाही थकले,
पसरू नये हात,
म्हणून तू झाकून घेतले...
