STORYMIRROR

Dhananjay Deshmukh

Others

3  

Dhananjay Deshmukh

Others

आई जिजाऊ तुझा विचार..

आई जिजाऊ तुझा विचार..

1 min
191

छंद आगळा गंध वेगळा, रंग निराळा तुझा विचार,

मंद वारा थंड गारा पाझरता झरा तुझा विचार.


उमलणार्‍या त्या रंगीबेरंगी कोमल फुलासम,

आसमंतात सार्‍या दरवळणारा तुझा विचार.


घेऊन गिरक्या नभात सार्‍या त्या गरुडासम,

गवसणी गगनास घालणारा तो तुझा विचार.


देई आम्हा तो संकट समयी जगण्यास प्रेरणा,

निर्बलासही प्रसंगी बळ देणारा तुझा विचार.


तुच माता तूच पिता आम्हा सकल जणांची,

पसरवू आम्ही जगात सार्‍या अनमोल तुझा विचार.


हे जगत जननी राजमाता राष्ट्रमाता आई जिजाऊ,

मनामनात सार्‍या ठसला आज फक्त तुझा विचार.


Rate this content
Log in