आई बोलव ना गं एकदा तरी
आई बोलव ना गं एकदा तरी
आई ! बोलव ना गं एकदा तरी
मला माहेरच्या उंबरठ्यावर ॥
लग्ना आधी माझं ही
होतं ना गं ते हक्काचा घर ॥
त्याच अंगणात खेळायची मी
मैत्रीणी बरोबर मनसोक्त ॥
दादा प्रमाणे माझ्या ही देहात
खेळे ना गं तुझाच रक्त ॥
मग आई ! बोलव ना गं एकदा तरी
मला माहेरच्या उंबरठ्यावर ॥
माझी ईच्छा तरी कुठे होती गं
तुला आणि बाबाला सोडून जाण्याची ॥
तुचं म्हणायची मुलगी म्हणजे
असते अब्रू दोन्ही घराण्याची ॥
मग आई ! बोलव ना गं एकदा तरी
मला माहेरच्या उंबरठ्यावर ॥
घरदार,मुलबाळ संसार सारं
मी सांभाळते गं क्षणोक्षणी ॥
पण एकदातरी माहेरची आठवण
येऊन जाते गं माझ्या ध्यानी मनी ॥
मग आई ! एकदा तरी बोलव ना गं
मला माहेरच्या उंबरठ्यावर ॥
शहरातल्या पंचपक्वान्न जेवणाला
तुझ्या भाकरीची सर येत नाही ॥
मऊ गादी आणि मखमली चादर
तुझ्या पदराचा ऊब देत नाही ॥
मग आई ! बोलव ना गं एकदा तरी
मला माहेरच्या उंबरठ्यावर ॥
तुमच्या सरत्या वया सोबत
मलाही घेऊ द्या ना जरा जगून ॥
डोळे माझे ही दिप्तील गं
तुला आणि बाबांना डोळे भरून बघून ॥
मग आई ! बोलव ना गं एकदा तरी
मला माहेरच्या उंबरठ्यावर ॥
नाही गं मला दादाच्या हीस्यातील
धन दौलतीची मुळीच भूक ॥
शोधून ही सापडत नाही गं
माहेरच्या अंगणासारखी कुठेच सुख ॥
मग आई ! बोलव ना गं एकदा तरी
मला माहेरच्या उंबरठ्यावर ॥
तुमच्या नंतर कोण आहे गं
तिथे आम्हाला विचारणारी ॥
फक्त तुमच्या आठवणी राहतील शिल्लक
हीच तर आहे जगाची रीत खरी
मग आई ! बोलव ना गं एकदा तरी
मला माहेरच्या उंबरठ्यावर ॥
