STORYMIRROR

yuvaraj jagtap

Others

1  

yuvaraj jagtap

Others

"आई -बाप"

"आई -बाप"

1 min
3.1K


तुम्हीचं माझी आई 

अन तुम्हीचं माझे बाप ।।धृ।।


मरून गेली आई

काय केले होते पाप

तुमच्या डोळ्यात पाहिली

मी अश्रूंची होताना वाफ


माझा करणार नाही सांभाळ

म्हणून केले नाही परत लग्न

माझ्या आयुष्यात तुम्ही

येऊच दिले नाही विघ्न


किती सहन केला 

माझ्याच साठी ताप

लागली जरी जीवाला

जीवघेणी धाप


माझ्याच साठी सर्व

संकटांशी केलेत दोन हात

माझ्या कोवळ्या आतड्यात

शिजवून खाऊ घातला भात


माझ्याच जीवनासाठी

कशाचाच केला नाही विचार

मनी न आणला अविचार

बनले नाहीत कोणापुढे लाचार


माझ्यात तुम्ही स्वतःला 

सतत पाहत राहिले

तुमचेच वैवाहिक आयुष्य

जगायचे राहून गेले


माझ्याच साठी सर्वस्वाचा

तुम्हीच केलात मोठा त्याग

मनाप्रमाणे जगून घ्या आता

येणार नाही मज राग


Rate this content
Log in