आहेस फुलांचा राजा
आहेस फुलांचा राजा
1 min
385
आहेस फुलांचा राजा
तरीही अगदी साधा
हात लावताना तुला
मध्ये काट्यांची बाधा।।
आहेस फुलांचा राजा
तूच प्रेमाचे प्रतीक
पाहताना मुक्त तुला
स्फुरते नवनवे गीत।।
आहेस फुलांचा राजा
सर्वात उठून दिसतोस
फुलांच्या या राज्यात
राजा तूच शोभतोस।।
