STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Others

आहे एक वेडी मुलगी

आहे एक वेडी मुलगी

1 min
260

आहे एक वेडी मुलगी

नेहमी कविता करत बसायची

घडून गेलेल्या क्षणांना 

कागदावर मांडत असायची

 

कधी विचारात गुंतायची

तर

कधी कवीतेला शब्द शोधायची

शब्दांचा मेळ झाला तर

ती शब्दाला शब्द जुळवायची.

 

विचाराला विचारुन शब्द

कवितेत मांडायची

खुप सारे विचार करुन

कवितेला शब्द आणायची

 

कधी आयुष्यावर तर कधी

नशीबावर कवीता करायची

कविता करता करता ती

कवितेत हरवून जायची

...... आहे एक वेडी मुलगी.......


Rate this content
Log in