आहे बरा
आहे बरा

1 min

24
नव्हतो कधीही
शर्यतीत मी
आहे जिथे मी
तिथेच बरा !
धाव धाव धावून
जायचे कुठे ?
दिले जे दैवाने
मी आहे बरा !
दम घूटतो
श्वास सुटतो
नाही धावेन
विसावा बरा !
ओळखा सीमा
ओळखा मर्यादा
थांबा जरा
एन्जॉय करा !