|| आहार ... आजचा नी कालचा ||
|| आहार ... आजचा नी कालचा ||
आजकालच्या तरुण मुली
नाही पोळी लाटत
नाही चटणी वाटत
मग काय, मस्त बर्गर पार्टी
नाही ऐकत हल्लीची कार्टी
रोज खायचे मॅगी, पास्ता
सकाळचा हाच त्यांचा नाश्ता
हरवुन गेले उपमा, पोहे, थालीपिठ
आजीला सांगतात, नको नको, त्यांचा येतो विट
पिझ्झा खाऊन दाखवायचा परदेशी थाट
संपुर्ण पोटाची लावतात वाट
आइस्क्रिम बरोबर कॉफी पिण्याचे नवे थेर
चहूबाजूंनी वाढत आहे शरीराचा घेर
ना उठता येत ना बसता, नाही चिंता
ओषधे घेऊन नाही सुटत हा गुंता
पथ्यपाणी लहानपणापासुन सुरु
आईवडील लागले चिंता करु
पुर्वी लोक खायचे वरण भात तुप
आयुष्य लाभायचे त्यांना भरपुर
कधी नाही फिरकायचे शुगर, ब्लड प्रेशर
गाठायचे ते शंभरी नॅचरल
औषधांच्या यादीचा करता मित्रांबरोबर चॅट
बोलता बोलता येतो क्षणात हार्ट अटॅक
सांगणे एकच, सांभाळा तारतम्य खाण्याचे
रम्य हे जिवन जगण्यासाठी जगण्याचे
तामसी आहार नको, सात्विक आहार घ्या
जा उमद्या घोड्यासारखे कामाला
नको अवेळी बोलवू दारात यमाला ||
