STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Others

4  

Meenakshi Kilawat

Others

आगमन पावसाचे

आगमन पावसाचे

1 min
28.9K



मन पाऊस पाऊस कसा

शब्दावाचून सांगुन गेला

सूर सुगंधी मुग्ध मातिचा

हर्षवी क्षणात तनामनाला..

ऋतु हिरवा ऋतु बरवा झाला..

हिरवळतो पृथ्वीवरती साऱ्या

साक्षात्कार तो पावसाचा

कणाकणात जीवन भरतो

कसा कुणी तो वर्णावयाचा.......

ऋतु हिरवा ऋतु बरवा झाला..

मधुर रसमय पाऊस अद्भूत

त्रिभूवन दरवळतो गंधाराने

सरीता ही मदमस्त वाहती

निसर्ग फुलते सारे यौवनाने.....

ऋतु हिरवा ऋतु बरवा झाला..

ओठात गीत गाती सृष्टी सारी

लता-वेली ही मोहरून जाती

पावसाचे आगमन होताच

पुन्हा नव्याने आशा स्फुरती..

ऋतु हिरवा ऋतु बरवा झाला..

धरती-पाताळ-नभ आता

आनंदाने चींब न्हाती

नाचे गगनी तारा-कारा

सारी धरणी तृप्त होती...

ऋतु हिरवा ऋतु बरवा झाला..

नभी मेघ निनाद गर्जून भारी

सनई,चौघडे,पखवाज वाजती

पावसाचा स्वैर इशारा होता

रवि-शशी ही वेडावून जाती...

ऋतु हिरवा ऋतु बरवा झाला..


இந்த உள்ளடக்கத்தை மதிப்பிடவும்
உள்நுழை