आगमन पावसाचे
आगमन पावसाचे
1 min
224
गार वारा झोंबणारा
अंग सारे शहारले,
मंद सुगंध मातीचा
मन मंत्रमुग्ध झाले..!!१!!
थुई थुई मोर नाचे
झाडे वेली मोहरले,
आले आभाळ भरून
मन माझे बहरले..!!२!!
रम्य नयन नजारा
आभाळात साठवला,
सज्ज झाले परिसर
पावसात भिजायला..!!३!!
चातकाची चोच आता
थांबे वाट पाहण्यास,
पावसाचा थेंब पडे
तृष्णा शांत करण्यास..!!४!!
पेरणीच्या तयारीने
शेतकरी सुखावला,
काळ्या ढेकळात आज
कष्ट दाखवू लागला..!!५!!
पाहताच चोहिकडे
आले दाटून ढगाळ,
कोसळावे सऱ्या आज
व्हावे मोकळे आभाळ..!!६!!
