STORYMIRROR

Manisha Awekar

Others

3.0  

Manisha Awekar

Others

आगमन गणरायाचे

आगमन गणरायाचे

1 min
263

अक्षरसंख्या  12 यती 6व्या अक्षरावर


आला आला आला , गणपती आला

आनंद झाला हो , आनंद झाला हो  //ध्रु//


गणेश चतुर्थी , आगमन झाले

सकल भक्त हे , नाचाया लागले

किती मी सांगू हो , मोद जहाला हो  (1)


गजानना तव , रुप मनोहर

चिंता हरविसी , तूचि विघ्नहर

वाट पहाती हो , आनंद झाला हो  (2)


विद्या नि कलांचा , तूच अधिपती

संकट विघ्नांना , तूच हरविसी

नाचू गाऊ या हो , या बाप्पा आला हो   (3)


श्रद्धा हो भक्तांची , आहे मनोमनी

हरशील चिंता ,विघ्ने हरवूनी

तूच रक्षक हो , तूच तारिसी हो (4)


Rate this content
Log in