आदर
आदर
आपल्याला पूर्वजांनी दिलेला आहे वारसा
आदर असावा आपल्या पुढील आरसा
कोणाशीही बोलतांना असू द्यावे वयाचे भान
लहान असो वा मोठा करावा
प्रत्येकाचा आदर, द्यावा त्याला सन्मान प्रतिबिंब म्हणून उमटेल मान
बोलण्याला असावी नम्रतेची सांगड
ज्याने जिंकू शकणार आपण सन्मानाचा गड
बोलतांना प्रत्येक शब्द बरोबर तोलावा असावा त्या बोलण्याला आपुलकीचा ओलावा
बोलतांना बोलणाऱ्यास
घालावा साज
प्रेमळ बोलणे करते कुठेही राज
शब्द कधीही वापरावे प्रामाणिक
करावा प्रत्येकांच्या भावनांचा आदर
आपल्या माणसांना दुःखवण्यात
नको मस्करीपायी अनादर
न करावी कधी निंदा कुणाची नाही ऐकावी
स्वतःच्या अवगुणाला बघून
दुसर्यांची गुण निवडावे नेहमी
कधी न करावा वडीलधार्या माणसांचा अपमान त्यांच्यामुळेच तर मिळालं हे जीवन छान
त्यांच्याप्रती असावा नेहमी आदर, सदाचार अन् नमस्कार
मधुरता असते ज्यांच्या वाणीत
ते व्यक्ती नेहमी राहतात आठवणीत
म्हणूनच करावा आदर मातापित्यांचा
करावा आदर मोठ्या माणसांचा
जपावी संस्कृती आणि आदर करावा सर्वांचा..🙏😊
