आधारवड
आधारवड
1 min
252
वडिल असतात आपले अदृश्य कवच,
ऊन पाऊस वारा सोसून आपल्याला जपत.
संसाराचा भार पेलून रात्रंदिन खपत.
दिसत नाहित अश्रू म्हणून दुःख नाही कळत.
सर्वांना आधार देत स्वतः असतात होरपळत.
वडिलसुद्धा माणूस असतात, त्यांचे मातीचेच पाय
आपुलकी-चार प्रेमळ शब्द अजून चाहतात काय?
