आधार ....!
आधार ....!
1 min
201
लहानपणी बाजारात गेलं की ,
बाबांचं बोट घट्ट पकडलेलं
असायचं फिरताना
आधार म्हणून ....
बोटांची जागा आता सायकल
आणि बाईकने घेतली
आणि मी बाबांची जागा ....
खूप काही बदललं
काळासोबत फिरताना
फक्त बदलले नाहीत संदर्भ
बाबा आणि
बाबांच्या भक्कम आधाराचे ....!!!!
