STORYMIRROR

Deore Vaishali

Others

3  

Deore Vaishali

Others

आभासी हे जग...

आभासी हे जग...

1 min
244

विज्ञानाची कास धरून,

मानवाने केली क्रांती,

मंगळाचीही झाली वारी,

रिमोट हाता हातात खेळती....


पंचतारांकित झाले सारे,

नवक्रांतीची मनी आस,

यंत्रानीच जीवन सारे,

माणसे झाली कामचुकार..


सिमेंटच्या जंगलात,

हिरवाईचा झाला र्हास,

फुकटचा प्राणवायू,

विकत भेटतो आज.......


सुखसुविधांची चंगळ,

रोबोट हाती कामाला,

जिवंतपणाचा अभाव सारा,

माणुसकी गेली विकोपाला.....


आभासी हे जग,

सारे त्यात गुंतले,

निसर्गाची किमया सारी

आज सारेच विसरले....


Rate this content
Log in