STORYMIRROR

Suvarna Patukale

Others

3  

Suvarna Patukale

Others

आभाळ होते दाटलेले

आभाळ होते दाटलेले

1 min
354

आभाळ होते दाटलेले

सांडले न होते

बोलले इतके परी

मन कोंडलेच होते

किती पुस्तके हाताशी

अन् वाचकही होते

परी वेळ ना कुणाला

कोणी वाचले न होते

खारा समुद्र होता 

आकंठ बुडविणारा 

मजला तहान ज्याची 

ते थेंबही न होते 

होते आकाश माझे 

अणि असंख्य पक्षी

तरी त्यात ओळखीचे

कोणी पाखरु न होते 

गर्दीत राहते मी 

नेहमीच माणसांच्या 

सारे सभोवती पण 

कोणी सोबती न होते 

आतून वेदनांनी 

फोडला टाहो किती 

ऐकले तरीही कधी 

कोणी समजले न होते 

संकटांची श्रृंखला 

होती क्षणाक्षणाला 

जवळ जरी सगळेच 

कोणी जवळचे न होते. 


Rate this content
Log in