अ...कलेची दिवाळी !!
अ...कलेची दिवाळी !!
ज्याचं त्याला कळत असतं
की भलं आपलं कशात असतं
माझ्यावाचून येथे कोणाचं
कोड मात्र सुटत नसतं!!धृ!!
युक्तीचा हा खेळ मांडुनी
क्षणोक्षणी त्यावर खेळत राहू
करू प्रश्नांचा भडिमार त्यांच्यावरी
सोबत फजिती त्यांची करत राहू!!१!!
पण स्तिथी मात्र वेगळी होते
प्रत्येक क्षणी ती बदलते
हुशारी असून माझ्यामध्ये
फजिती मात्र माझीच होते!!२!!
हल्ली मी ही शिकलोय
माझं माझंच जगायचं
पाऊस नसेल तेव्हा
शॉवरखाली भिजायचं!!३!!
नशीब हे असंच असतं
त्याच्याशी जपून वागावं लागत
वाईट करुनि दुसऱ्याच
भोगाव नंतर आपल्यालाच लागत!!४!!
विझलो आज जरी मी
हा माझा अंत नाही
पुन्हा नव्याने उभा राहीन कारण
माझे सामर्थ्य नाशवंत नाही
माझे सामर्थ्य नाशवंत नाही!!५!!
