52आठवडे लिखाण आव्हान स्पर्धेसाठी
52आठवडे लिखाण आव्हान स्पर्धेसाठी
मिटवून सारे मतभेद
चाले पुरूषाच्या जोडीने.
अशी आहे भारतीय स्त्री
रुप खुलते तिचे साडीने..
माता, भगिनी, पत्नी अशी
सर्व नाती जपती गोडीने.
तिला नसतो कसला हव्यास
राबते जीवनी ती ओढीने..
प्रेम, माया, वात्सल्याची
तिला असते सुंदर देण.
आपल्या माणसांसाठी
सदा हळवे तिचे मन..
तिक्ष्ण बुद्धीचा वापर
करते सुधारण्या देश.
जीव ओतून राबते
अंगी संचारता जोष..
बनून अशी ती निर्भिड
करते दु:खांचा विनाश.
करण्या रक्षण घराचे
तोडते सुखांचेही पाष.
धारण करुन अवतार
कधी बनते रुद्ररुपी
करते संहार दुर्जनांचा
नाश पावतो मग पापी..
अशी आहे भारतीय स्त्री
कधी आग तर कधी पाणी
गाथा तिच्या आहेत बहू
लिहिता पडते अपुरी लेखणी..
