STORYMIRROR

vanita shinde

Others

3  

vanita shinde

Others

52आठवडे लिखाण आव्हान स्पर्धेसा

52आठवडे लिखाण आव्हान स्पर्धेसा

1 min
200

तरुणाईच्या वळणावरती

जीवनाला फुटते दिशा.

पडता पाऊल वाटेवरती

क्षणोक्षणी एक नवी परिक्षा..


तरुणाईचे मन बावरे

नसते त्यास कसले भान.

सळसळत्या रक्ताचा जोष

लावतो सहज पणाला प्राण..


तरुणाईच्या वळणावरती

गोड स्वप्नं येतात मनी.

त्या स्वप्नांना देण्या आकार

फिरतो सैरभैर सर्व स्थानी..


भल्या बु-याची नसते तमा

नसते फिकीर कधी कशाची.

धडपड करत सुसाट पळतो

जिद्द मनी ती इच्छापुर्तीची..


सुसंगतीने सुंदर घडते

भविष्य तरुणाचे उज्ज्वल.

वाईट संगतीच्या नादाने

जीवन बनते रे असफल..


Rate this content
Log in