52आठवडे लिखाण आव्हान स्पर्धेसा
52आठवडे लिखाण आव्हान स्पर्धेसा
1 min
196
पाना फुलांची
चौफेर हिरवळ
नि दरवळ..
शितल वारा
वाहतो झुळझुळ
नाद मंजुळ..
पाऊस धारा
आतुर भेटायला
या धरणीला..
चराचरात
पसरतो आनंद
मनमुराद..
शृंगारुनिया
डोलतो हा निसर्ग
भासतो स्वर्ग..
निसर्ग कधी
होतो कर्दन काळ
करतो खेळ..
हाती त्याच्याच
जीवनाचीया डोर
जीवाला घोर...
